नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणात महानाट्य सुरू असतानाच राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकरणीची बैठक बोलवत विविध ठराव पारित केले आहेत.
या बैठकीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस.आर. कोहली यांना पक्षातून निलंबित केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या बैठकीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला असून बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अजित पवार यांनी आज दिल्लीतील शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस हरकत घेतली आहे.
या संदर्भात निवडणूक आयोगाकडे याचिका आधीच दिली आहे. मुंबईमध्ये बैठक घेतल्यानंतर शरद पवार यांनी दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठक बोलावली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, वंदना चव्हाण, सोनिया दुहान, धीरज शर्मा, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैसल, एस के कोहली, योगानंद शास्त्री आणि व्ही. पी. शर्मांसह अन्य मोठे नेते उपस्थितीत होते.
या बैठकीमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या सध्याच्या पेचप्रसंगानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड
उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश
आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर
ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार
आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना