Saturday, May 4, 2024
Homeक्राईममोठी बातमी! पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या. मुख्य आरोपीला पोलिसांनी घातल्या...

मोठी बातमी! पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या. मुख्य आरोपीला पोलिसांनी घातल्या बेड्या

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.शिरवळ मधून पोळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोळेकर हा पळून जात असताना पुणे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बेड्या ठोकळ्याची माहिती मिळत आहे.

आरोपी मुन्ना पोळेकर यांच्याकडून पोलिसांनी ३ पिस्टल जप्त केल्या आहेत. ज्या पिस्टलने शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता, ती पिस्टल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यातील आरोपींचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. याचाच बदला घेण्यासाठी आज या आरोपींनी शरद मोहोळ याला जिवे मारण्याचा कट रचला होता.

कोण होता शरद मोहोळ?


दरम्यान, शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पिंटू मारणे हत्येप्रकरणी मोहोळला अटक केली होती. याच हत्या प्रकरणात तो जामिनावर होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय