Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:सावली निवारा केंद्रात मानवतावादी कार्य सुरू आहे-रविंद्र सागडे - सावली निवारा केंद्रास...

PCMC:सावली निवारा केंद्रात मानवतावादी कार्य सुरू आहे-रविंद्र सागडे – सावली निवारा केंद्रास आर्थिक देणगी व कुर्ते वितरण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.०५-पिंपरी येथील अनाथ,रस्त्यावर सोडून दिलेल्या नागरिकांची देखभाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड मनपा पुरस्कृत रिअल लाईफ रिअल पीपल या सेवाभावी संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सावली निवारा केंद्राच्या दैनंदिन खर्चासाठी वुई टूगेदर फाउंडेशनच्या वतीने टाटा मोटर्स कंपनीतील निवृत्त कर्मचारी रविंद्र सागडे यांनी 11 हजार रुपये देणगीचा चेक पर्यवेक्षक गौतम थोरात यांना  सुपूर्द केला.

तसेच निवारा केंद्रातील पुरुषासाठी सदस्य श्री उल्हास दाते यांनी नवीन कापड घेवून त्याच्या तब्बल 30 कुर्ते शिऊन सुपूर्द केले.तसेच संस्थेचे खजिनदार दिलीप चक्रे यांनी चांगले व उबदार कपडे दान केले.

यावेळी रविंद्र सागडे म्हणाले,पिंपरी चिंचवड महानगरपालिका व रिअल लाईफ रिअल संचालित सावली निवारा केंद्रात मानवतावादी कार्य सुरू आहे,नात्यातील लोकांनी रस्त्यावर सोडून उपेक्षित जीवन जगणाऱ्या विमनस्क लोकांचा सांभाळ करणे त्यांना सक्षम करण्यासाठी सेवाभावी कार्य इथे केले जात आहे,या सेवा कार्यात माझे छोटेसे योगदान देताना आनंद होत आहे.


यावेळी वुई टूगेदर फाउंडेशनचे  अध्यक्ष सलीम सय्यद,खजिनदार दिलीप चक्रे,सदस्य उल्हास दाते,रविंद्र सांगाडे सह
‘रिअल लाईफ-रिअल पीपल’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसेन,गौतम थोरात,सचिन बोधनकर, अग्नेश फ्रान्सिस,मिलिंद माळी,अमोल भाट, सुनिता श्रीनाथ,लक्ष्मी वाईकर,उमा भंडारी,वंदना नायडू यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय