Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:सिग्नल तोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकामुळे पादचारी नागरिकांचे जीव धोक्यात

PCMC:सिग्नल तोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकामुळे पादचारी नागरिकांचे जीव धोक्यात

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: आकुर्डी-चिखली रोड येथील संभाजीनगर परिसरातील थरमॅक्स चौकामध्ये सिग्नल असूनही बेशिस्त वाहन चालकांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडणे भाग पडते. थरमॅक्स चौक अनेक मुख्य रस्त्यांना जोडणारा चौक, बाजारपेठ व बसस्थानकामुळे वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. चौकातून भोसरी, निगडी, आकुर्डी व चिखलीकड़े जाणारा मुख्य रस्ता असल्याने वर्दळ असते. बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेकदा छोट्या मोठ्या स्वरूपाचे अपघात घडत असतात. थरमॅक्स चौक परिसरातील मुख्य चौकामध्ये अनेक कार्यालये, शोरूम, बँक व्यावसायिक गाळे, बसस्थानक, रिक्षा स्टॅन्ड असल्याने पादचारी आकुर्डी निगडी, चिखली व भोसरीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. वाहतूक नियंत्रक पोलीस तसेच सिग्नल चालू असताना सुद्धा अनेक वाहनचालक विशेष करून ऑटो रिक्षा बेशिस्तपणे वाहने भरधाव वेगाने चालवत असतात.


त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड होऊन बसते. वेडीवाकडी वळणे घेत दुचाकी चालक विरुद्ध बाजूने येऊन अपघातास निमंत्रण देत असतात. पर्यायाने स्वतः सहित इतरांच्या जीवास धोक्यात घालून वाहने दामटतात. ऑटो रिक्षा,दुचाकी चालकांनी तसेच वाहन चालकानी स्वयंशिस्त पाळून वाहने चालवावी.
असे सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर सेटलमेंट न करता थेट कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी दुभाजकाची अडथळा असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालावे लागते यासंदर्भात जुलै 2023 मध्ये अ प्रभाग मध्ये संपन्न झालेल्या जनसंवादासभेत तक्रार केली होती परंतु अद्याप कारवाई झाली नाही.
शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ते)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय