Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी : उत्तराखंड मध्ये हिमकडा कोसळला, तपोवन धरण फुटले असंख्य लोक...

मोठी बातमी : उत्तराखंड मध्ये हिमकडा कोसळला, तपोवन धरण फुटले असंख्य लोक बेपत्ता

उत्तराखंड : उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ आज सकाळी भयंकर घटना घडली आहे. हिमकडा कोसळून मोठा पूर आला आहे. त्यामध्ये 150 पेक्षा अधिक लोक वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने धरण क्षेत्रात अति दक्षतेचा इशारा दिला आहे.

गंगा पॉवर प्रोजेक्ट्स आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला असून, धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणी पातळी प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घरांना तडाखा बसला असून, अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय