पुणे : राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. Big decision of the education department! 14 thousand schools in the state will be closed
राज्यातील दुर्गम भागांमधील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्लस्टर स्कूल’ (समूह शाळा) सुरू करण्यात येणार आहेत. नंदुरबार येथील तोरणमाळ व पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन क्लस्टर स्कूलच्या धर्तीवर राज्यात आता सर्व ठिकाणी क्लस्टर शाळा उभारल्या जाणार आहे.
यामुळे कमी पटसंख्येच्या तब्बल 14 हजार 783 शाळा बंद होणार आहेत.
राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत 15 ऑक्टोबरपर्यंत क्लस्टर शाळा संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक मुलाला त्याच्या घराजवळ शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यातील अतिदुर्गम भागात कमी पटसंख्या असणार्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळेच शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी व त्यांना शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध होण्यासाठी क्लस्टर स्कूल (समूह शाळा) सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यावर अनेक शिक्षण तज्ज्ञांकडून टीकाही होत आहे.
मात्र, क्लस्टर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
तर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, क्लस्टर शाळा सुरू करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकांची पदे कमी करणे, असा कोणताही उद्देश नाही. तर गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा हेतू आहे.
काल (दि.२३) रोजी पुण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारने निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पुणे विभाग शिक्षण आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षणतज्ञ गीता महाशब्दे, भाऊसाहेब चासकर व अन्य शिक्षण क्षेत्रातील शिक्षक संघटना, एसएफआय, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा
पटसंख्या शाळासंख्या
– इयत्ता 1 ते 5 – 1734
– इयत्ता 6 ते 10 – 3137
– इयत्ता 10 ते 20 – 9912
एकूण 14 हजार 783