नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात सतत वाढणाऱ्या इंधनाच्या किंमती पाहता या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जात आहे. या अनुषंगाने मंगळवारी केंद्र सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांवरील नोंदणी शुल्क घेण्यात येत होती. आता मात्र, नोंदणी शुल्क माफ करण्यात आली आहे. याबाबत परिवहन मंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आला आहे.
संपादन – रफिक शेख