Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणजुन्नर : जीवधन किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने तरुणीचा मृत्यू

जुन्नर : जीवधन किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने तरुणीचा मृत्यू

जुन्नर / आनंदा कांबळे : ऐतिहासिक नाणेघाट (ता. जुन्नर) जवळील जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ४) घडली आहे. 

या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ (वय ३० रा. दिल्ली) असल्याची माहिती 

जुन्नर पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी  दिली. सदर तरुणी दिल्लीहून ठाणे येथे आली होती. ३१ जुलै रोजी रुचिका दिल्लीहून ठाणे येथील ओमकार बाईत यांचेकडे आली होती, त्यानंतर डोंबिवली पूर्व येथील दिनेश रामकरण यादव व मंजू दिनेश यादव यांच्या समवेत चौघेही ३ ऑगस्ट रोजी माळशेज घाट मार्गे नाणेघाट येथे फिरण्यासाठी आले होते, रात्री मुक्काम करून सकाळी जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना पाय घसरून रुचिका या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर रुचिकास जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले.

या सर्व परिसरात पर्यटनाला बंदी असूनही अतिउत्साही पर्यटक पोलीस यंत्रणेला झुगारून किंवा दंड भरून येथे येत आहेत. मागील आठवड्यात याच परिसरात पोलिसांना अरेरावीची भाषा वापरणाऱ्या पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय