Friday, April 26, 2024
HomeNews"भगवद्गीता ज्ञान व कार्य संस्कृती शिकवणारा ग्रंथ आहे" श्यामसिंग,टाटा मोटर्स...

“भगवद्गीता ज्ञान व कार्य संस्कृती शिकवणारा ग्रंथ आहे” श्यामसिंग,टाटा मोटर्स कारप्लान्ट हेड

चिखली प्राधिकरण पेठ क्र.16 येथे ‘गीता जयंती’ उत्सव संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर

समाज मनातील निष्क्रियता व निराशा दूर करण्यासाठी भगवद्गीते मध्ये मौलिक संदेश आहेत.भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात सुप्रसिद्ध विचारांची पेरणी श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला प्रेरणा देण्यासाठी केली,त्यालाच गीतासार असे म्हणतात.
आधुनिक जगाच्या जडघडणीमध्ये सतत वृद्धिंगत होणारे ज्ञान व कार्य संस्कृतीची शिकवण गीतेमध्ये असल्यामुळे या ग्रंथाची गोडी संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला मराठी भाषेत उपलब्ध करून दिली.अशा भावना टाटा मोटर्स कार प्लांट चिखलीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री.श्यामसिंग,चिखली प्राधिकरण येथे गीता ग्रंथ पूजन करताना व्यक्त केल्या.


ते पुढे म्हणाले की,विद्यमान समाजामध्ये तृप्त,शाश्वत जीवन प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने
आपल्या कार्य संस्कतीतून परमार्थ साधला पाहिजे.व्यक्तिगत प्रगतीसाठी कर्म करताना समाजातील उपेक्षितांचे कल्याण करण्यासाठी आपण कृतिशील राहिले पाहिजे.तरच समृद्ध समाज निर्माण होईल.असे ते म्हणाले.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,राजे शिवाजीनगर,पेठ क्र.16,चिखली प्राधिकरण येथे गीता जयंती निमित्त होम,हवन,याग कार्यक्रमात गीता पूजन श्याम सिंग व त्यांच्या पत्नी यांचे हस्ते करण्यात आले.या वेळी टाटा मोटर्सचे कर्मचारी व शेकडो भाविक,सेवेकरी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय