Thursday, April 25, 2024
HomeNewsपीएमपीच्या ताफ्यातील सर्व बसमध्ये 'क्यूआर कोड' बसविण्याची कार्यवाही सुरू, मंगळवारपासून अंमलबजावणी

पीएमपीच्या ताफ्यातील सर्व बसमध्ये ‘क्यूआर कोड’ बसविण्याची कार्यवाही सुरू, मंगळवारपासून अंमलबजावणी

वाहकांना प्रशिक्षण; प्रायोगिक तत्त्वावर चाचणी यशस्वी

सुट्या पैशांवरून होणारे कंडक्टर आणि प्रवाशांचे वाद कमी होणार



पुणे
: पीएमपीच्या ताफ्यातील सर्व बसमध्ये येत्या मंगळवारपासून ‘गुगल पे’ची सेवा सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीकडून करण्यात आलेली प्रायोगिक तत्त्वावरील चाचणी नुकतीच पूर्ण झाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.यामुळे नेहमी सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. आपल्याला नेहमीच पीएमपी कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यात सुट्या पैशांवरून वाद होत असल्याचे कानी पडते.

हे वाद थांबविण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ऑनलाईन असलेली ‘गुगल पे’ सेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सुरूवातीला पीएमपी प्रशासनाने ‘पुणे दर्शन’ बससेवेत ही प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली. ती चाचणी आता यशस्वी झाली आहे. त्यामुळे नियमित तिकिटाच्या यंत्रणेसोबतच प्रवाशांना ‘गुगल पे’ सेवासुद्धा उपलब्ध होणार आहे.

सर्व बसमध्ये क्यूआर कोड…


पीएमपी प्रशासनाने आता ताफ्यातील सर्व बसमध्ये मंगळवारपासून ऑनलाईन पेमेंट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासन पातळीवर विविध कार्यवाही करण्यात येत आहे. यात बसमध्ये ‘क्युआर कोड’ लावण्याचे काम सुरू असून, ताफ्यातील सर्व बसमध्ये हा ‘क्युआर’ कोड बसविण्यात येणार आहे.

पीएमपीच्या बसमध्ये आम्ही येत्या मंगळवारपासून ‘गुगल पे’ सेवा सुरू करत आहे. त्यासंदर्भातील प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बसमध्ये थेट ‘क्युआर कोड’द्वारे तिकिट मिळेल.

– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय