पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये कडक निर्बंध घालण्यात आले यामुळे कालावधीमध्ये श्रमिक कष्टकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या कष्टकरी वर्गाला दिलासा म्हणून राज्य शासनाने ५ हजार ४७६ कोटी रुपयांची आर्थिक मदत १३ एप्रिल ला जाहीर केली होती. त्यानुसार पथारी, हातगाडी, टपरी स्टॉल धारकास १५०० रुपये थेट खात्यांमध्ये जमा होण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली याची प्रत दाखवुन फेरीवाल्यानी समाधान व्यक्त केले. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि महाराष्ट्र हॉकर फेडरेशन तर्फे महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीचे स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, मुख्य समन्वयक मैकंजी ड़ाबरे, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, प्रदेश संघटक अनिल बारवकर, इरफान चौधरी सुशेन खरात, नितीन भराटे, किरण साडेकर, यासीन शेख, सुरेश देडे, सुधीर गुप्ता हे उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून सुमारे एक वर्षापासून टाळेबंदी सदृश्य स्थिती आहे. या परिस्थितीमध्ये व्यावसायिकांनी जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झालेला असताना नैशनल हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे वारंवार आर्थिक सहाय्याची मागणी केली होती.
राज्य सरकारने ही मागणी मान्य करत १ हजार ५०० रुपये थेट मदतीची घोषणा केली. व केंद्र शासनाने १० हजार रुपयाची कर्ज योजना घोषित केली. ही रक्कम अत्यंत अल्प आहे आणि लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे या कालावधीमध्ये पुन्हा अजून प्रत्येकी १० हजार रुपये प्रत्येकांच्या खात्यावरती जमा करावे त्याच बरोबर केंद्र शासनाच्या कडेही या प्रकारची मागणी करण्यात येत आहे, असेेेही नकाते म्हणाले.
तसेच या कालावधीमध्ये राज्यातील फेरीवाल्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून शासन स्तरावर ती अनेकांची नोंद झालेली नाही ही नोंद महापालिका कडून घेण्यात येऊन या सर्व फेरीवाल्यांना नोंदणीकृत विना नोंदणीकृत आशा सर्वांनाच लाभ देण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली त्यास सकारात्मक प्रतिसाद आहे, असे नखाते म्हणाले.