बीड : शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे लाभार्थी मंजूर करण्यासाठी महाऑनलाईन यांच्यामार्फत संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील अर्जदारांनी https//revenue.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.
विविध योजना – संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी राष्ट्रीयीकृत बँक, पोस्ट बँक मध्ये सर्व लाभधारकांनी आपले खाते उघडण्यावे.
या योजनांचे निकष व कागदपत्रांच्या माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र येथे संपर्क करता येईल.
तसेच लाभार्थ्यांनी राष्ट्रीयीकृत बँके/पोस्ट बॅक व्यतिरिक्त इतर बँकेत खाते असल्यास आपले अनुदान पाठविण्यात येणार नाही. राष्ट्रीयीकृत/पोस्ट बँकेत खाते उघडणेसाठी पोस्टमन किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.