Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यकोरोनामुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी परळीत घेतली आढावा बैठक

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी परळीत घेतली आढावा बैठक

परळी (प्रतिनिधी) : परळी शहरात कोरोना विषाणू समुह संसर्गाचा धोका वाढल्यामुळे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार स्वतः फिल्डवरून उतरून काम करत आहेत. आज पंचायत समितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

या आढावा बैठकीत अजित कुंभार यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, महसूल प्रशासनातर्फे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय केंद्रे,नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तालुका गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, उपजिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. अर्षद यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाने घरोघर सर्वेक्षणाचा निर्णय घेतला असून २५ हजार ५९७ घरातील १ लाख ३३ हजार ९४३ लोकांचे सर्वेक्षणदेखील सुुरु करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत त्याबाबत त्यांनी संबंधित विभागांसोबत चर्चा केली.

त्यानंतर अजित कुंभार यांनी येथील कोविड सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पहाणी केली. भेटी दरम्यान त्यांनी येथील तयारी बाबत समाधान व्यक्त करत संबंधित विभागांना काही सूचना केल्या आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. सध्या १२ जुलै पर्यंत शहरात पूर्ण वेळ संचारबंदी असल्याने सर्वांनी आपल्याला घरात रहावे असे आवाहन त्यांनी या भेटीदरम्यान केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय