Thursday, May 9, 2024
Homeजिल्हाबीड : SFI चे जिल्हास्तरीय अभ्यास शिबीर

बीड : SFI चे जिल्हास्तरीय अभ्यास शिबीर

बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे दोन दिवसीय बीड जिल्हा अभ्यास शिबिर जवाहर विद्यालय माजलगाव येथे होत आहे. यावेळी आज उद्घाटन सत्रामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केसापुरी कॅम्प चे मुख्याध्यापक अभिमन्यू इबिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उद्घाटन केले.

एसएफआयचे राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष लहू खारगे होते. त्यांनी सत्राचा शेवटी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सचिव संतोष जाधव यांनी केले.

उद्घाटन सत्राच्या नंतर पहिल्या सत्रामध्ये एसएफआयच्या वैचारिक लढ्याची दिशा अर्थात घटना आणि कार्यक्रम या विषयावर एसएफआयचे राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कमिटी सदस्य विष्णू गवळी हे होते त्यांनी सत्राच्या शेवटी अध्यक्षीय समारोप केला. सत्राचे संचलन आदित्य कासारे यांनी केले.

पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात शिक्षण रोजगाराच्या समस्या आणि त्या संबंधित संघर्ष या विषयावर एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे हे होते. त्यांनी सत्राच्या शेवटी अध्यक्षीय समारोप केला. सत्राचे संचलन जिल्हा कमिटी सदस्य शिवा चव्हाण यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय