Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यबीड : महामारीमध्ये रुग्णसेवा करणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी

बीड : महामारीमध्ये रुग्णसेवा करणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे  तहसीलदारांमार्फत निवेदनाद्वारे केली मागणी

वडवणी (अशोक शेरकर) : महामारीमध्ये रुग्णसेवा करणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी कोव्हीड कर्मचाऱ्यांनी वडवणी तहसीलदारांमार्फत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या दीड वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून संपूर्ण जगामध्ये कोव्हीड – 19 या विषाणूने थैमान घातले असून, कोरोना सारखा आजर आला व या महाभयंकर जागतिक महामारीने हाहाकार माजवला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये देशातील व राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर  खूप मोठे आव्हान निर्माण झाले होते, आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी पडत होते, अशा भीतीदायक वातावरणात देखील अनेक गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींनी डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय च्या भूमिकेतून आपल्या जीवाची कसलीही परवा न करता रुग्णसेवा केली, रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली, असेही म्हटले आहे.

रुग्णसेवा करत असताना अनेक कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त झाले तर काही कर्मचाऱ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यूदेखील झाला पण तरीही न डगमगता आपली रुग्णसेवा चालूच ठेवली, मात्र अलीकडच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक कोविड सेंटर बंद पडले असून, कोविड सेंटरमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले आहे, तर आणखी काही सेंटर बंद पडण्याची शक्यता असून नंतर तेथील कर्मचाऱ्यांना देतील सेवेतून कमी करण्यात येणार आहे, जागतिक महामारी मध्ये गरज असताना देशसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. त्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून रुग्णांना मानसिक आधार दिला व त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली हे कौतुकास्पद आहे. मात्र आज त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सेवेतून कमी केल्यामुळे बेरोजगारीची वेळ आली आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यांना आरोग्य विभागातील रिक्त पदांवर कायम सेवेवर सामाविष्ट करून घ्यावे अश्या मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी वडवणीतील कर्मचारी लहू खारगे, अमोल वाघ, प्रशांत सदरे, किरण डिगे, साहिल शिंदे, सोहेल शेख आदी उपस्थित होते तर निवेदनावर डॉ.अर्चना स्वामी, डॉ.राहुल शिंदे, डॉ.सोनाली राऊत, अमर बडे, स्टाफ नर्स सारिका खडके, अनिता पाटील, उषा निर्मळ, अलका नागरगोजे, अश्विनी खोटे, सुनीता तोगे, डाटा एंट्री ऑपरेटर मंगेश प्रभाळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नारायण पवार, वॉर्डबॉय कल्पना दिवटे, शशिकांत चिलगर, अहमद शेख, आकाश तोरे, शुभम अंबुरे, बाबू गुरसाली आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय