परळी वैजनाथ : गोदावरीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या पाच गावातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मंगळवारी (ता. १४) परळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कॉ. अजय बुरांडे यांनी सांगितले आहे.
परळी तालुक्यातील गोदावरी काठावरील पोहनेर, बोरखेड, तेलसमुख आदी गोदावरी नदी भागातील शेतामध्ये पुराचे प्रचंड पाणी साचले होते. गोदावरी नदीला प्रचंड पुर आला होता. या पुरामुळे शेकडो एकर शेतातील पीके उध्दवस्त झाली आहेत. काही काढनीला आलेली सोयाबीन चिखलात रूतली आहे. उस व कापुस जमीनीवर पडला आहे. याची पाहणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली.
सावधान ! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा
या नुकसानीची पाहणी किसान सभेच्या कॉ. अजय बुरांडे, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. रूस्तुम माने, कॉ. बालासाहेब कडभाने यांनी सोमवारी (ता.१३) शेतात जाऊन केली.
शेतकऱ्यांना धीर देत मंगळवार (ता.१४) रोजी गोदा किनार्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे 100% नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून एनडीआरएफच्या धर्तीवर तात्काळ निधी उपलब्ध करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी घेऊन परळी उपविभागीय अधिकाऱ्यांना किसान सभेचे शिष्टमंडळ भेटुन निवेदन देणार असल्याचे किसान सभेचे नेते कॉ.अजय बुरांडे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ब्रेकींग : माध्यमातील वृत्तानंतर बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित