मुंबई : राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून मुंबई, पुणे, ठाणे चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त प्रमाणात आढळून आल्याने आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत. डोळ्याबरोबर मलेरिया, चिकन गुणियाचेही रुग्ण आढळून येत आहेत.यासाठी राज्यसरकारने आरोग्य विभागाला सतर्क केले आहे.
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले कि, शाळेतील मुलं असतील किंवा वयस्कर लोक यांची काळजी घेतली जात असून जास्त फैलाव होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. ही साथ ‘व्हायरल कन्जक्टिव्हायटस’ या डोळ्याच्या विषाणूजन्य आजारांमुळे आहे आणि लवकर तसेच योग्य उपचार व काळजी घेतल्यास डोळे बरे होतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
काय काळजी घ्यावी?
■ डोळ्यांची स्वच्छता राखा
■ डोळे आल्यास बाहेर जाताना चष्मा घाला.
■ टॉवेल आणि कपडे कोणालाही वापरण्यास देऊ नका.
■ संसर्ग झाला असल्यास शाळा, महाविद्यालये किंवा कार्यालयातून सुट्टी घ्यावी.
■ संसर्ग झाल्यास डोळे दिवसातून दोनदा थंड पाण्याने धुवावेत.
■ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच आय ड्रॉप तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावे.
■ स्टिरॉइड्स असलेली औषधे वापरू नये.