Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाबार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात निदर्शने

बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात निदर्शने

बार्शी (सोलापूर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनेच्या वतीने दि  8 जुलै रोजी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व वाढती महागाई, जीवनाश्यक वस्तुंची भाववाढ केंद्र सरकारने केल्याच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आले. 

यावेळी श्रमिक, आदिवासी शेतकरी चळवळीचे नेते भीमाकोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात जेलमध्ये मृत्यू पावलेले स्टॅन स्वामी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, “केंद्र सरकार हे भांडवलदारांचे हित पाहत आहे तर कष्टकरी वर्गाला जगणे मुश्किल करत आहे, माणसे मरत आहेत आणि सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारात गुंतले आहे, महागाई वाढलेली असताना जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपाने आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढला आहे, भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांना फसवत आहे. “

आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार मुंडे यांना कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, कॉ.सुरेखा शितोळे यांंनी दिले. यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड प्रवीण मस्तूद, कॉ. अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, कॉ. धनाजी पवार, कॉ. भारत भोसले, कॉ. लक्ष्मण घाडगे, कॉ.आनंद धोत्रे, कॉ.बालाजी शितोळे, कॉ.किसन मुळे, कॉ.जयवंत आंबिले, कॉ.सुनिल सालसकर, कॉ. संदीप तुपे, कॉ.संगीता गुंड, कॉ.निर्मला सरवदे, कॉ.विकास पवार, कॉ. आयाज शेख, तूषार कांबळे आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय