Friday, November 22, 2024
Homeजिल्हाBaramati: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण अधिकाऱ्यांची माहिती

Baramati: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण अधिकाऱ्यांची माहिती

Baramati, दि. ४: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदानाच्यादृष्टीने मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत.

बारामती विधानसभा मतदारंसघात ३८० मतदान केंद्र, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोर एकूण ५६१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्र आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत.

दौंड विधानसभा मतदासंघात २ हजार ५९७, इंदापूर २ हजार ५१८, बारामती ३ लाख ५००, पुरंदर ३ हजार ३७७, भोर ४ हजार ६२ व खडकवासला मतदार संघासाठी ४ हजार ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे ६ मे रोजी वितरण करण्यात येणार असून दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकारी द्विवेदी यांनी दिली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय