Monday, May 6, 2024
HomeNewsमंदिरात पूजा करण्यास बजरंग दलाने आलिया भट आणि रणबीर कपूरला रोखले कारण.....

मंदिरात पूजा करण्यास बजरंग दलाने आलिया भट आणि रणबीर कपूरला रोखले कारण.. !

सध्या देशभरात बॉलीवूड कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चढ्ढा चित्रपटावरून मोठा वाद उभा राहिला होता.

या धर्तीवर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटावरून आता वादाला सुरुवात झाली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर उज्जैनच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून दोघांनाही मंदीरात प्रवेश करण्यास विरोध केला. यामुळे आलिया, रणबीर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी मंदिरात न जाण्याच्या निर्णय घेतला.

दरम्यान, रणबीर सिंगने आपण गोमांस खातो अशी कबुली दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे सध्या Boycott Brahmastra ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय