पिंपरी चिंचवड : मुसळधार पावसामुळे पिंपळे सौदागर, राहटणी येथील अनेक रस्त्यांची चाळण होऊन सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी रस्त्याची कामे अजून सुरूच आहेत. काँक्रीटीकरण डांबरीकरण करताना योग्य गुणवत्ता ठेवली असती तर रस्ते उखडले गेले नसते. अशी टीका येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे.
पावसामुळे रस्त्यावर तळी साचली आहेत, लेव्हल नसल्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी सर्वत्र पसरत आहे. वाहनचालकाना रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. राहटणी, पिंपळे सौदागर येथील रस्त्याची दुरुस्ती करताना गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचेशी तडजोड करू नये, असे विशाल जाधव म्हणाले.