Sunday, April 28, 2024
HomeNewsबी. व्होकेशनल च्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश द्या – SFI-DYFI ची मागणी

बी. व्होकेशनल च्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश द्या – SFI-DYFI ची मागणी

नागपूर विद्यापीठ प्रशासकीय इमारत समोर निदर्शने

नागपूर :
बी. व्होकेशनल च्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश द्या, या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या विद्यार्थी व युवक संघटनेचा वतीने नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत समोर B.Voc. च्या विद्यार्थ्याना M.Voc. , MSc सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी निदर्शने केली. तसेच कुलगुरूंसोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना डीवायएफआय चे जिल्हा अध्यक्ष अमित हटवार म्हणाले, B.Voc. Medical Laboratory and Molecular Diagnostic Technology हा डिग्री कोर्स नागपूर विद्यापीठाने सुरू केला. ऍडमिशन च्या वेळेस व माहिती पुस्तकात (प्रोस्पेक्ट) मध्ये हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना M.voc., MSc मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता येईल म्हणून सांगण्यात आले. पण वास्तविक पाहता कुठलेच कॉलेज विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात ऍडमिशन द्यायला तयार नाही. B.Voc. या कोर्समध्ये प्रत्येक सेमिस्टर ला विषय बदलतात त्यामुळे MSc मध्ये प्रवेश देने शक्य नाही असं विद्यार्थ्यांना महाविद्यालय द्वारे सांगण्यात आले. कुठे रोजगारासाठी गेल्यास B.Voc. काय आहे, कुठला कोर्स आहे असं विचारण्यात येत व कुणीही नोकरी देत नाही. याबाबतीत विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना अनेकदा निवेदन ही दिले. पण प्रत्येक वेळेस वेगवेगळी कारण सांगण्यात आली आणि पाहता पाहता विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्ष वाया गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयात प्रवेश द्यावा, अभ्यासक्रमाच्या झपाट्याने वाढणाऱ्या शुल्क वाढीवर आवर घालावा अशी मागणी निदर्शनात करण्यात आली.

विद्यार्थ्यांशी चर्चेत B.Voc. हा कोर्स स्वयंरोजगार देणारा आहे व यात उच्च शिक्षण घेण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी याचा उद्देश जाणून घ्यावा. माहिती पुस्तकात M.Voc व MSc मध्ये प्रवेश देऊ असे त्या महाविद्यालयाने म्हंटल असलं तरी विद्यापीठाचे काम फक्त शासनाने सांगितल्यावर महाविद्यालयाला संलग्नता देणे एवढेच आहे आणि M.Voc. हा कोर्स कुठेच सुरू करण्यात आला नाही. तसेच तुमची ही समस्या शासनासमोर मांडावी असं कुलगुरूंनी सांगितले.

निदर्शनात डी.वाय.एफ.आय चे जिल्हा अध्यक्ष अमित हटवार, रजत लांजेवार, प्रीतम वासनिक, प्रगती रहाटे, शुभम घटे, आनंद आकरे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

Lic

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय