Friday, November 22, 2024
Homeशिक्षण४ ऑगस्ट : शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या टॉप ९ बातम्या वाचा एका क्लिक...

४ ऑगस्ट : शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या टॉप ९ बातम्या वाचा एका क्लिक वर.

१. कोर्टातील खटल्यामुळे परिक्षा पुढे ढकलली जाणार नाही.

शुक्रवारी युजीसीने याचिकेवर म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी कोर्टात केस प्रलंबित असलेमुळे परीक्षा होणार नाहीत असा समज करू नये. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेची तयारी करावी. यूजीसीची याचिका झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

२. नवीन शैक्षणिक धोरणावर ममता सरकार संतप्त.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार केंद्राच्या नवीन शिक्षण धोरणामुळे संतप्त आहेत. नवीन शैक्षणिक धोरण हे आमच्या सरकारशी चर्चा न करताच तयार करण्यात आल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.  याचा आढावा घेण्यासाठी शैक्षणिक समितीची स्थापना करण्यात आली असून समिती नवीन शैक्षणिक धोरणाचे विश्लेषण आणि अहवाल देणार आहे. यावर कोणाला वैयक्तिक मत द्यायचे असेल तर १५ ऑगस्टपूर्वी राज्य सरकारला लेखी देण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

३. मुलांना ऑनलाईन नैतिक शिक्षण दिले जाणार.

 कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आता मुलांना नैतिक शिक्षण देणारी संस्था ऑनलाइन शिक्षण देणार आहे..  यासाठी हेमा फाउंडेशनच्या वतीने नैतिक मूल्यांवर आधारित ‘ हेम वर्च्युज ‘ या शैक्षणिक वेब पोर्टलची सुरूवात करण्यात आली आहे.  याद्वारे विद्यार्थ्यांना जीवन मूल्ये आणि इतर क्रियाकलापांवर आधारित 9 शॉर्ट फिल्मद्वारे शिक्षण दिले जाणार आहे..

४. दोन भाषेचे धोरण बदलणार नाही.

तामिळनाडूच्या सीएम ई. पालिनिस्वामी यांनी म्हटले आहे की, राज्याच्या दोन भाषेच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही. हे अनेक दशकांपासून चालू आहे. नवीन शिक्षण धोरणावर केंद्राने फेरविचार करावे. हे एक वेदनादायक पाऊल आहे. तामिळनाडू ३ भाषेचे सूत्र अंमलात आणू देणार नाही. राज्यांना त्यांच्या धोरणांनुसार नवीन शिक्षण धोरण राबविण्याची परवानगी देण्यात यावी.

५. नवीन शैक्षणिक धोरणात मुलभूत सुधारणा करा – एसएफआय

नवीन शैक्षणिक धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीला घेऊन स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने आज देशव्यापी आंदोलन केले. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणाचे अजून मोठ्या प्रमाणात खाजगीकरण, बाजारीकरण व केंद्रीकरण करण्याचे धोरण आहे. लोकशाही प्रक्रिया टाळून आलेल्या विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण असल्याचे एसएफआय ने म्हटले आहे.

६. देशभक्तीपर कविता स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने कविता स्पर्धेचे आयोजन केले आहे.  कोणताही भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतो. यासाठी माझ्या शासकीय व्यासपीठावर नोंदणी करणे आवश्यक आहे. कवितेत किमान १० ओळी असाव्यात. शेवटची तारीख ७ ऑगस्ट आहे.  अनुक्रमे १५ हजार , ७ हजार ४५०० आणि ५ हजार चे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. अधिक माहितीसाठीः www.mygov.in/task/national-level-patriotic-poem-competation/

७. नांदेड जिल्ह्यात तोटंबा गाव केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचा पुतळा जाळून शैक्षणिक धोरणाला विरोध.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधील तोटंबा या गावात स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करत केद्रींंय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल यांचा पुतळा जाळण्यात आला.

८. अमेरिकन शिक्षकांनी संपाचा इशारा दिला.

अमेरिकेतील ७० टक्के शिक्षकांनी असा इशारा दिला आहे की कोरोना कालावधीत शाळा सुरू झाल्या तर ते संपावर जातील. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शाळा उघडण्याचा आग्रह धरत असताना हे घडत आहे.  अमेरिकेत कोरोनामध्ये आतापर्यंत ४५,६८,३७५ रूग्ण आले आहेत.  तर १,५३,८४८ मृत्यू झाले आहेत.

९. परिक्षेशिवाय इंटरशीप नाही.

कोरोनामुळे वैद्यकीय परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी परीक्षा शिवाय इंटरशीप  सुरू करण्यास भारतीय वैद्यकीय परीषदेने नकार दिला आहे. या प्रकरणावर सुनावणी शुक्रवारी उच्चन्यायलयात होणार आहे. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात बाधा होऊ नये म्हणून इंटरशीप सुरू करावी व कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घ्याव्यात अस ठरविण्यात आल होत. तशी भारतीय वैद्यकीय परिषदेकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

संकलन – अमित हटवार

संबंधित लेख

लोकप्रिय