Sunday, May 19, 2024
Homeआंतरराष्ट्रीयइलॉन मस्क यांच्या नव्या फीचरने WhatsApp ची उडाली झोप, वाचा कोणतं आहे...

इलॉन मस्क यांच्या नव्या फीचरने WhatsApp ची उडाली झोप, वाचा कोणतं आहे नवं फीचर

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. सातत्याने वेगवेगळे फीचर आणले जात आहे, अशात आता इलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉल ही करता येणार आहे. त्यामुळे हे फीचरमुळे आता एक्स हे थेट मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देऊ शकतं.

साधारणपणे आपण ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलसाठी व्हॉट्सअपचा वापर करीत असतो. त्यासाठी आपण आपल्या फोन नंबरचा वापर करतो. मात्र आता इलॉन मस्क यांनी केलेल्या घोषणेनुसार आता एक्स वर कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. त्यासाठी फोन नंबरची गरज नसणार आहे.

मस्कने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट केली की, “एक्सवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करता येतील. लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे. आयओएस, अँड्रॉईड, मॅक आणि पीसी या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर काम करेल.” असं मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एक्स अकाउंटच्या माध्यमातून ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असण्याची गरज नाही. आयफोन, अँड्रॉईड, अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय