Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणशिरपूर तालुक्यातून जयस, बिकेडी व बिरसा ब्रिग्रेड हिना गावीत विरोधात आक्रमण,...

शिरपूर तालुक्यातून जयस, बिकेडी व बिरसा ब्रिग्रेड हिना गावीत विरोधात आक्रमण, तहसीलदार शिरपूर यांना दिली निवेदन

शिरपूर : नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्यावर खासदार डॉ. हिना गावित द्वारा होत असलेल्या बेछूट आरोपा विरोधात राज्यभरासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून आज तहसीलदार शिरपूर यांना जय आदिवासी युवा शक्ती (जयस), बिरसा ब्रीगेड सातपुडा विभाग, आदिवासी विकास परिषद, बिरसा क्रांती दल यांनी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या समर्थनार्थ आज निवेदन दिले. 

सदरचे निवेदन बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख सुशिलकुमार पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 8-10 आदिवासी संघटनांनी निवेदने दिलीत. तर दुसरीकडे काही राजकिय पक्षही डॉ. हिना गावित यांच्या विरोधात ऊभे ठाकले आहे.

यावेळी बिरसा ब्रिगेडचे सातपुडा विभाग अध्यक्ष सुंदरलाल पावरा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार जितेंद्र पावरा, बिरसा क्रांती दलाचे जिल्हा महासचिव विलास पावरा, आदिवासी विकास परिषद धुळे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष ऊमेश पावरा, बीकेडीचे तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, जयसचे तालुकाध्यक्ष भूपेश पावरा, बिरसा ब्रीगेडचे तालुका उपाध्यक्ष डॉ. सुनिल पावरा, चंदन पावरा, कैलास पावरा, आदिवासी विकास परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष पिंटू पावरा, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख करण शेवाळे आदी उपस्थित होते.

या निवेदनात हिना गावीत  खासदार नंदुरबार यांच्या विरोधात त्यांच्या घरासमोर जाहीर निषेध आंदोलन दिनांक 16 मे 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता करणार आहोत. असे नमूद केले आहे. हिना गावीत यांचा सामाजिक व राजकीय अशा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय