Friday, November 22, 2024
Homeजुन्नरचिंचोली येथे निसर्गाचे रौद्ररूप, ढगफुटी होऊन पाऊसाचा हाहाकार

चिंचोली येथे निसर्गाचे रौद्ररूप, ढगफुटी होऊन पाऊसाचा हाहाकार

वडज (ता. जुन्नर) : जुन्नर शहराच्या दक्षिणेस १० ते १२ कि.मी.अंतरावर डोंगर रांगाच्या परिसरात वसलेले गाव म्हणजे चिंचोली. सलग दोन – तीन दिवसांपासून निसर्गाच्या प्रकोपापुढे निःशब्द झाल्याची प्रचिती चिंचोलीच्या ग्रामस्थांना आली. सव्वा तास झालेल्या धुवाधार पावसाने काही क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकल.

अनेकांच्या घरात पाणी शिरले, घरे पडली, बांध – बंधारे अक्षशः फुटून मार्ग मिळेल तिकडे पाणी पसरू लागले. शेतातील सोयाबीन, टोमॅटो, ऊस, गाजर, बटाटे, भाजीपाला अशी सर्वच पिके पाण्यावर तरंगू लागली, कांदा चाळीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. वाजेवाडीतील प्राथमिक शाळेची ऑल कंपौंडची भिंत पडल्यामुळे वर्गखोल्यात पाणी शिरल्याने शालेय साहित्याचे देखील खूप नुकसान झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीने हतबल झालेल्या शेतकऱ्याची शासन पातळीवर त्वरित दखल घेऊन मदत मिळावी तसेच चिंचोली परिसरातील फुटलेले बंधारे न फुटलेले बंधारे, धोकादायक बंधारे यांचे त्वरित सर्वेक्षण करणे, यांची मागणी सरपंच खंडू काशिद तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

शेतीचे यांत्रिकीकरण, बदलते हवामान, प्रचंड वृक्षतोड, बांध कोरून शेती वाढविण्याच्या लोभापायी नैसर्गिक प्रवाह बंद होणे, ओढे नाले बुजऊन शेती क्षेत्रात वाढ करणे, त्यात निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेती क्षेत्राचे खूप नुकसान होत आहे, भविष्यात या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रगतिशील शेतकरी रामचंद्र पानसरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, झाले “हे” महत्वाचे निर्णय

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास त्यांना खायला घालणारे जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय