Thursday, April 25, 2024
HomeNewsनितीन गडकरी देशात उभारणार इलेक्ट्रिक हायवे रेल्वे प्रमाणे धावणार ट्रक !

नितीन गडकरी देशात उभारणार इलेक्ट्रिक हायवे रेल्वे प्रमाणे धावणार ट्रक !

पुणे : इंधनाचे (Fuel) दर सातत्याने वाढत आहेत. वायू प्रदूषणाची पातळीदेखील वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) खरेदीकडे कल वाढत आहे.
सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अधिक विस्तारणार आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात इलेक्ट्रिक हायवे अर्थात विद्युत महामार्ग (Electric Highway) उभारला जाणार आहे.

बस, ट्रकसारखी अवजड वाहनंदेखील विजेवर चालवण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. हे ट्रक आणि बसेस इलेक्ट्रिक वाहनांसारखे असतील; मात्र ही मोठी इलेक्ट्रिक वाहनं महामार्गावर ओव्हरहेड बसवलेल्या इलेक्ट्रिक केबल्सच्या साह्याने (Electric Cable) चार्ज करता येतील. याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू झाला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय