Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयनुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची निघृन हत्या, शहरात तणावाची स्थिती इंटरनेट सेवाही...

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची निघृन हत्या, शहरात तणावाची स्थिती इंटरनेट सेवाही बंद

उदयपूर : भाजपने निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट लिहणाऱ्या व्यक्तींची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उदयपूर शहरात तणावाची स्थिती आहे.

कन्हैयालाल तेली असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे उदयपूर शहरात धनमंडी येथे टेलिंगचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. त्यांनी कापड मोजमापाचा बहाणा करून दुकानात घुसून निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोरांनी हत्या करतानाचा व्हिडीओही तयार केला असून आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येनंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या उदयपूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट 24 तासांसाठी बंद करण्यात आले आहे. एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. कलम 144 लागू असतानाही भाजपने बंद पुकारला आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ‘उदयपूरमध्ये तरुणाच्या झालेल्या हत्येचा मी निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाणार आहेत. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय