Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाआशा वर्करांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने; भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगांवर कारवाईची मागणी

आशा वर्करांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने; भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगांवर कारवाईची मागणी

सिंधुदुर्ग : भारतीय कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी देशाच्या अनेक कुस्ती महिलांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर मंतरवर महिला कुस्तीचे २३ २०२३ पासून सुरू झालेले बेमुदत धरणे आंदोलन अजूनही सुरुच आहे. भाजप सरकारने अद्याप आरोपीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासनाच्या अधिकारी दर्शना चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, ब्रिजभूषण सिंग किंवा हरियाणाचे मंत्री संदीप सिंग यांनाही अटक करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर या खेळाडूंचे म्हणणेही कोणी ऐकून घेतलेले नाही. देशातील सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंच्या बाबतीत असा अन्याय होत असेल तर सर्वसामान्य स्त्रियांना न्याय कसा मिळायचा ? हा देशातील तमाम महिलांचा प्रश्न आहे.

केंद्रीय कामगार संघटना, महिला, विद्यार्थी आणि युवा इ. अनेक संघटना तसेच एसकेएम, सारख्या अनेक संयुक्त व्यासपीठांनी या संघर्षाला पाठिंबा व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जिल्हा परिषद गेटसमोर निदर्शने करून अन्यायग्रस्त खेळाडूंना पाठिंबा देत आहोत. केंद्र सरकारने त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना अटक करून सखोल चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

निवेदन देतेवेळी प्रियांका तावडे, आरोही पावसकर, सुप्रिया गवस, सुनिता पवार, भाग्यश्री बांदिवडेकर, अंकिता कदम, दुर्वा म्हाडेश्वर, वर्षा परब उपस्थित होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय