Friday, November 22, 2024
Homeजिल्हाAsha sevika : आशा - गटप्रवर्तक युनियन सीटू तर्फे महिला मेळावा संपन्न

Asha sevika : आशा – गटप्रवर्तक युनियन सीटू तर्फे महिला मेळावा संपन्न

नागपूर : गुरुदेव सेवाश्रम येथे आशा व गटप्रवर्तक (Asha sevika) कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची अध्यक्षता कॉ. राजेंद्र साठे यांनी केली. कार्यक्रमाला शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी काँ. राजेंद्र साठे यांनी महिला चळवळी चे महत्व पटवून सांगितले.

आशा वर्कर व गटप्रवर्तक (Asha sevika) यांचा झालेला संप आणि त्यावेळेस कशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला चळवळीची सुरुवात कुठून आणि कशी झाली? त्याचबरोबर आजच्या परिस्थितीमध्ये महिलांना संघटित ठेवून काय साध्य करू शकतो यावर प्रकाश टाकण्यात आला. सतत ५० दिवस चाललेल्या संपात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत जीआर काढण्याकरता आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी जो कठीण परिश्रम केला त्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता आशा वर्कर यांना फक्त ५ हजार रु. मानधन वाढ व गटप्रवर्तक यांना काही न दिल्यामुळे संपूर्ण राज्यातील गटप्रवर्तकांमध्ये व आशा वर्कर मध्ये निराशा पसरलेली आहे. त्वरित राज्य शासनाने तोडगा ना काढल्यास गटप्रवर्तकाच्या हिताकरता आशा वर्कर यांनी परत संपामध्ये उतरण्याची तयारी करावी असे आपल्या संबोधनातून सांगण्यात आले. त्यावर सर्वांनी एकमताने निर्णय पारित केला.

कार्यक्रमाला कॉ.राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौणीकर, डॉक्टर देवगडे, उज्वला कांबळे, माया कावडे, प्रमोद कावळे, आरती चांभारे, अर्चना कोल्हे, रेश्मा सातपुते, लक्ष्मी कोत्तेजवार, आशा वानखेडे, मंदा गंधारे, कल्पना राऊत, वंदना बहादुरे, प्रतिमा डोंगरे,मंगला बागडे, सरिता धोटे सह शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

संबंधित लेख

लोकप्रिय