Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याKedarnath : केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप

Kedarnath : केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप

Kedarnath : दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची पायाभरणी सुरू होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पायाभरणीला केदारनाथ (Kedarnath) मंदिराच्या पुजारांसह ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध दर्शवला आहे. शंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, “केदारनाथमध्ये सोन्याचा मोठा घोटाळा झालेला आहे आणि या मुद्द्यावर योग्य तपासणी का केली जात नाही?” त्यांनी असा आरोपही केला की, केदारनाथमधील घोटाळ्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ (Kedarnath) मंदिर बांधले जाईल आणि तिथे पुन्हा घोटाळा होईल.

गेल्या वर्षी केदारनाथ (Kedarnath) मंदिरातील एका पुजाऱ्याने सोन्याच्या मुलामा देण्याच्या कामात १२५ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्याने सोन्याऐवजी पितळेचा मुलामा केल्याचा आरोप झाला होता, परंतु मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला. शंकराचार्यांनी या संदर्भात मत मांडले की, “केदारनाथमध्ये तब्बल २२८ किलो सोनं गायब झालं आहे, याचा हिशोब कोण देणार?”

Kedarnath

या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे आणि दिल्लीतील मंदिर उभारणीच्या विरोधामुळे वादाला नवे वळण मिळाले आहे. आता या प्रकरणात पुढे काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

संबंधित लेख

लोकप्रिय