Wednesday, February 19, 2025

PCMC : आयएमएकडून डॉक्टर आणि स्टाफ साठी वेबिनारद्वारे प्रशिक्षण शिबीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) पिंपरी चिंचवड़ भोसरी शाखेच्या वतीने नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल व जूनियर डॉक्टर्स यांच्यासाठी सर्वसमावेशक आणि महितीपूर्ण असा ऑनलाईन वेबिनार पार पडला. आयएमए पीसीबीच्या अध्यक्ष डॉ माया भालेराव यांनी या कार्यक्रमात सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीचे स्वागत केले. (pcmc)

रुग्णास प्राथमिक सेवा देणे, संवाद साधणे, सर्जरी किंवा अति दक्षता विभागात गंभीर रुग्णाची आत्मियतेने काळजी घेणे या महत्त्वाच्या भूमिका हॉस्पिटल स्टाफ बजावत असतो त्यांना प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी भूलतज्ञ डॅा. जितेंद वाघमारे, शल्यविशारद कॅन्सर तज्ञ डॅा. राकेश नेवे, पॅथोॅलॉजिस्ट विजय सातव, आय सी यू स्पेशालिस्ट डॅा. वेंकटेश धत, स्त्री रोगतज्ञ वर्षा डांगे, पिंपरी नर्सिग स्कूलच्या शाहीन शिकलगर, मिनाक्षी गिजरे, पोन्सेवी बेंजामीन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन दिले.

रुग्णाची काळजी कशी घ्यावी, रक्ताचे नमुने घेण्याची योग्य पद्धत, सीपीआर, योग्य शिष्टाचार या संबंधी अधिक माहिती दिली. आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे व सचिव डॉ. सौरभ संजनवाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (pcmc)

त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत असा प्रशिक्षण वेबिनार नियमित घ्यावा असे सुचविले.

सचिव डॉ. सारिका लोणकर व खजिनदार डॉ. मनीषा डोइफोडे यांचे संयोजन असून डॉ रूपाली एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारचा 500 हुन अधिक स्टाफ ने लाभ घेतला. (pcmc)

पिंपरी चिंचवड, पुणे, तळेगांव, नगर, अमरावती, औरंगाबाद, जालना, इंदापूर, दौंड, चंद्रपूर, जळगाव, पनवेल, कर्जत या ठिकाणी हे वेबिनार लाइव प्रक्षेपित झाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles