Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मोठी घोषणा केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी दोन दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. यानंतर, पक्षाच्या विधीमंडळाची बैठक होऊन नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवाल यांना नुकतीच जामिनावर सुटका मिळाली होती. यानंतर त्यांनी जनतेला एका सभेदरम्यान संबोधित करताना सांगितले की, येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू. जर मी प्रामाणिक असेन तर मला परत निवडून द्या, अन्यथा मत देऊ नका.”
सर्वोच्च न्यायालयाने काही अटी केल्या आहेत, जेणेकरुन मी काम करु शकणार नाही. अनेक कायदे करत माझे अधिकार काढून घेतले. पण मी तुमची काम बंद केलेली नाही. त्यांनी केंद्राच्या अटींना महत्त्व न देता प्रामाणिकपणा आणि जनतेच्या सेवेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. जर केजरीवाल प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर माझ्या पक्षाला भरघोस मतदान करा. मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन”, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
“फेब्रुवारीत निवडणुका आहेत, परंतु मला त्या नोव्हेंबरमध्येच घ्याव्यात असे वाटते,” असे केजरीवाल म्हणाले. जोपर्यंत निवडणुकांचा निकाल लागत नाही, जनमताचा कौल समोर येत नाही, तोपर्यंत मी जसा उल्लेख केला, त्याप्रमाणे मी दोन दिवसांनंतर माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. तोपर्यंत माझ्याऐवजी आप पक्षाचा दुसरा नेता मुख्यमंत्री होईल. येत्या दोन दिवसात विधीमंडळ पक्षाची एक बैठक होईल. आगामी दोन दिवसांत नवीन मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवले जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे पद तेव्हाच सांभाळतील, जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू.
अरविंद केजरीवाल म्हणाले, २०२० ला तुम्हाला सांगितलं होतं की जर मी काम केलं असेल तर मला मत द्या, अन्यथा देऊ नका. आज मी तुमच्यासमोर आलोय आणि तुम्हाला सांगतोय की जर मी प्रामाणिक असेन तर मला मत द्या, अन्यथा देऊ नका, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
Arvind Kejriwal
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती