Monday, December 23, 2024
Homeआंबेगावसैन्य व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू होणार; एसएफआय च्या मागणीला यश!

सैन्य व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू होणार; एसएफआय च्या मागणीला यश!

घोडेगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव अंतर्गत येणारे नागापूर येथील सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होणार आहे. प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्या निर्देशानुसार शारिरीक मोजमाप व कागदपत्रे तपासणीसाठी उद्या (दि.८) रोजी उपस्थित रहावे, असे सूचित करण्यात आले आहे. Army and Police Recruitment Training Center to be started at Nagapur

याबाबत बोलताना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी म्हणाले, एसएफआय सातत्याने सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत होती. एसएफआय च्या मागणीला यश आले आहे.

प्रकल्प अधिकारी याच्या निर्देशानुसार सैन्य व पोलिस भरती प्रशिक्षणाबाबत अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दि.08 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 02 या वेळेत नागापूर ता. आंबेगाव, जि. पुणे येथे शारीरीक मोजमाप व कागदपत्र तपासणी करीता उपस्थित राहावे.

आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. जातीचा दाखला

3. डोमासाईल

4. 10 वी 12 वी गुणपत्र व प्रमानपत्र

5. पासपोर्ट साईज 2 फोटो

वरील सर्व कागपत्रांची झेरॉक्स व शक्य असल्यास ओरिजनल कागदपत्र सोबत आणावेत.

संबंधित लेख

लोकप्रिय