Shirur: जिल्ह्यातील 36- शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिरुर लोकसभा (Shirur) मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून बी. मोहन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-204 असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9022669760 असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनिष जाधव हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9307808489 असा आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक, शिरुर लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 3.30 वाजेपासून सायं 5.30 वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.


हे ही वाचा :
ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…
मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी
खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात
ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !