Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI: अलंकापुरीत हनुमान जन्मोत्सव नामजयघोषात साजरा

ALANDI: अलंकापुरीत हनुमान जन्मोत्सव नामजयघोषात साजरा

आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री मारुती देवस्थान ट्रस्ट गोपाळपूर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, श्री हजेरी मारुती मंदिर यासह आळंदी परिसरात विविध ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे प्रथा परंपरांचे पालन करीत धार्मिक मंगलमय वातावरणात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी श्रींचेदर्शनास रंग लावून दर्शन घेतले.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मारुती जन्मोत्सवा निमित्त मालक बाळासाहेब आरफळकर यांचे वतीने बाळासाहेब शेवाळे महाराज यांनी कीर्तन सेवा केली.

यावेळी व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे, संजय रणदिवे, सोमनाथ लवंगे आदींसह भाविक, वारकरी उपस्थित होते. प्रथांचे पालन करीत माऊली मंदिर, श्री शनी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. यावेळी मानकरी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले.

गोपाळपुरातील वैभव असलेले श्री मारुती देवस्थान ट्रस्ट संचलित श्री मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन १८ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे सप्ताहात आयोजन करीत उत्सव साजरा करण्यात आला. यात काकडा आरती, अभिषेक, विष्णुसहस्त्र नाम, श्री ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रमाचा समावेश होता. श्री हनुमान जन्मोत्सव दिनी पहाटे पाच ते सात या वेळेत श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा, अभिषेक, महाप्रसाद वाटप करण्यात आल्याचे विश्वस्त ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले.

श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात श्रींचे जन्मोत्सव सोहळ्या निमित्त जन्मोत्सवाचे कीर्तन सेवा गोविंद महाराज गोरे यांनी रुजू केली. गावकरी भजनी मंडळाचे वतीने भजन सेवा हरिनाम गजरात झाली.

अमोल महाराज जाधव यांचे वारकरी विद्यार्थी साधकांचे वतीने हरिपाठ नामजयघोषात झाले. यावेळी भाविक, नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी करून रांगा लावून दर्शन घेतले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचेसह उपस्थित ग्रामस्थ, पदाधिकारी यांचे हस्ते मान्यवरांसह देणगीदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाचुंदे परिवाराचे वतीने श्रीनां चांदीचा हार अर्पण करण्यात आला.

यावेळी गोविंद महाराज गोरे यांना मंडळाचे वतीने मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. विजय गुळवे, गोविंद महाराज गोरे यांचेसह देणगीदारांचा नवशिवशक्त तरुण मंडळ, ग्रामदैवत श्री हजेरी मारुती जन्मोत्सव समिती, समस्त आळंदीकर ग्रामस्थ यांचे तर्फे सत्कार करण्यात आला. सुनील रानवडे, नितीन साळुंखे, सुधीर कुऱ्हाडे, पंडित घुंडरे, विशाल वाहिले, एकनाथ वाहिले, अर्जुन मेदनकर, उदय काळे, विठ्ठल घुंडरे, जालिंदर महाराज भोसले, पृथ्वीराज महाराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. Alandi

श्री आळंदी धाम सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी श्रींची पूजा केली. यावेळी दिनकर तांबे आदी उपस्थित होते.

इंद्रायणीनगर येथील इंद्रायणी मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी करून श्रींचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला. श्रींची पूजा, अभिषेक, सुरवसे महाराज यांची कीर्तन सेवा आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश रहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, मंडूबाबा पालवे, रवींद्र जोशी आदी उपस्थित होते.

आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा केंद्रातील श्री मारुती मंदिरात श्रींचा जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रम, पूजा, अभिषेक करीत साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक, भाविक, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. alandi

येथील काळा मारुती जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. कीर्तन, पूजा, अभिषेक परंपरेने झाला. यावेळी मुख पुजारी विलास वाघमारे, संकेत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोष महाराज मोझे यांचे वतीने बंद महाराज यांची कीर्तन सेवा झाली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त भावार्थ देखणे उपिस्थत होते. सालकरी पुजारी विलास वाघमारे, संकेत वाघमारे यांनी नियोजन केले.

श्री हजेरी मारुती मंदिरात आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अविनाश बोरुंदिया यांच्या वतीने लाडू महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी राजे ग्रुपचे विजयअप्पा पगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय