नाशिक : राजर्षी शाहूमहाराज स्मृती शताब्दी वतीने विनंती पूर्वक निवेदन करण्यात येते कि २०२२-२०२३ हे वर्ष राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती, नाशिक, तसेच सहयोगी संस्था – सोमवंशी शिक्षण वर्धक फंड, नाशिक संचलित “छत्रपती श्री शाहु महाराज वस्तीगृह” च्या वतीने भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्रपूर्व कालखंडात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रभर समाजक्रांतीचे खूप मोठे कार्य केले आहे, याच कार्याची प्रेरणा घेऊन राजर्षी शाहू महाराज ह्यांनी इथली सामाजिक आर्थिक विषमता संपवून न्यायावर आधारलेली समतावादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनेक पावले उचलली उदा. वसतिगृह, शाळा, कायदे इत्यांनी केलेल्या कार्याचा समाजजीवनावर फार मोठा प्रभाव पडला. अन्याय, शोषण, अंधश्रद्धा, धर्माधता, जात्यंधता, भेदाभेद, उच्च निचता, अश्या दोषांचे मधून भारतीय समाजमन बाहेर येण्यास फार मोठी मदत झाली.
देशातील शैक्षणिकसंस्था हया प्रागतिक कल्याणकारी दिशेने समाजमन घडवणारी महत्वाची ठिकाणे असतात, म्हणून राजर्षी शाहूमहाराजांचा वैचारिक वारसा घेऊन पुढे चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजर्षी शाहमहाराज समती शताब्दी समितीच्या वतीने आपणास नम्र विनंती करण्यात येते कि आपण आपल्या संस्थेतील राजकार्य व कर्तृत्वा वरील विविध विषयांवर आधारित निबंध स्पर्धेत सहभागी होण्याच्या सूचना देऊन राजर्षी शाहूमहाराजांच्या विचारांचा जागर घडवून आणावा.
• निबंध स्पर्धेचे विषय :
१) राजर्षी शाहूमहाराजांचे अर्थविषयक विचार आणि कार्य ।
२) राजर्षी शाहूमहाराजांचे सामाजिक विचार आणि कार्य ।
३) राजर्षी शाहूमहाराजांचे कामगार विषयक विचार आणि कार्य ।
• स्पर्धेची बक्षिसे :
स्पर्धेचे गट प्रथम पारितोषिक द्वितीयपारितोषिक तृतीयपारितोषिक (रोख स्वरुपात)
• माध्यामिक
(५ वी ते १०वी) ५०००/- , २०००/- , १०००/-
• उच्च माध्यमिक
(११ वी १२ वी) ५०००/- , २०००/- , १०००/-
• महाविद्यालयीन
(पदवी ते पदवीत्तर) ५०००/-, २०००/- , १०००/-
• उत्तेजनार्थ प्रतेक गटातील २० स्पर्धकांना ग्रंथ स्वरुपात देण्यात येतील.
• सर्व सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येतील.
•• निबंध स्पर्धेचे नियम
(१) निबंध लेखना साठी कोणत्याही भाषेचे बंधन नाही.
(२) निबंध लेखनासाठी शब्द मर्यादा किमान २०० शब्द ते कमाल १००० शब्द
( 3 ) निबंधाचे विषय ठरवून दिलेल्या विषय व्यतिरिक्त असल्यास निबंध बाद ठरविण्यात येईल.
(४) निबंध A4 साईजच्या पेपरवर स्वताच्या हस्तक्षरात असावा..
५) निबंध पाठविताना त्या सोबत विध्यार्थ्याने आपल्या शिक्षण संस्थेच्या ओळखपत्राची छायांकित प्रत जोडावी.
(६) निबंध दि. २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत खालील पत्यावर सुट्टीचा दिवससोडून कार्यालयीन वेळ सकाळी ११.०० आयटक कामगार केंद्र,२५अ मेघदूत शॉपिंग सेंटर, जुन्यासीबीएस, समोर, प्रिया हॉटेलच्या वरती नाशिक – ४२२ ००२.
७) निबंधा विषयीचा अंतिम निर्णय हा समितीचा असेल.
तरी सदर निबंध स्पर्धेचा उपक्रम राबविण्या साठी आपण आपल्या संस्थेतील शाळा महाविद्यालयाना सूचित करावे, असेही अध्यक्ष राजू देसले, सरचिटणीस जयवंत खडताळे, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, अँड प्रकोश काळे, अँड.नाझीम काझी आदींनी आवाहन केले आहे.