Saturday, January 28, 2023
HomeNews'गझल प्रेमऋतूची' या गझल संग्रहास पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

‘गझल प्रेमऋतूची’ या गझल संग्रहास पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

इचलकरंजी दि. २४ : ‘गझल प्रेमऋतूची ‘या प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी )आणि प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा (मुंबई) यांच्या गझल संग्रहाला पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार वितरण समारंभ मराठी भाषा दिनी अर्थात कुसुमाग्रज जन्मदिनी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी नागपूर येथे होणार आहे, असे पद्मगंधा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे आणि सचिव संगीता वाईकर यांनी जाहीर केले आहे.

गेल्या वर्षभरात मराठी काव्य क्षेत्रात व गझल विधेत स्वागतार्ह ठरलेल्या गझल प्रेमऋतूची या संग्रहाला यापूर्वी दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान (मुंबई ), लोकगंगा साहित्य पुरस्कार (अहमदनगर), सावित्रीबाई फुले पुरस्कार (ठाणे) करवीर साहित्य परिषद पुरस्कार (कोल्हापूर) इत्यादी पुरस्कारही लाभलेले आहेत. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या पुरस्काराने या संग्रहावर विदर्भातूनही मोहर उमटली आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय