Wednesday, February 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसीएनजी वाहन चालकांसाठी मोठी बातमी, 'या' तारखेपासून पंप राहणार बेमुदत बंद

सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेपासून पंप राहणार बेमुदत बंद

पुणे : पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडत असल्याने सध्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. आता सीएनजी वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.

पुण्यातील सीएनजी पंप चालकांनी येत्या 27 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने पंप चालकांनी हा बेमुदत संप पुकारलेला आहे. या संप काळात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देखील सर्वच सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. हा संप 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय