Friday, May 17, 2024
Homeजिल्हाअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा 

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, भरीव मानधन वाढ, मराठीतून पोषण ट्रेकर, ग्रॅच्युइटी, या व इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील दोन लाख सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी 100 टक्के सहभाग घेतला. आज (दि.२०) महावीर गार्डन येथून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे धडक मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी कॉम्रेड आप्पा पाटील नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कॉम्रेड जयश्री पाटील, रघुनाथ कांबळे, शोभा भंडारे, विद्या कांबळे, शमा पठाण यांनी संबोधित केले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय