Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणअमरावती : AISF तर्फे विविध मागण्यांचे कुलगुरूंना निवेदन

अमरावती : AISF तर्फे विविध मागण्यांचे कुलगुरूंना निवेदन

 

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये प्रलंबित असलेली पी.एचडी कोर्स वर्क परीक्षा घेण्यात याव्यात, या मागणीला घेऊन AISF तर्फे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. 

युजिसी च्या निर्देशानुसार नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे. पीएचडि करीता आवश्यक असलेली पात्रता परीक्षा (PET) उत्तीर्ण केली असुन त्यानंतर विद्यापीठाने निर्देशीत केलेल्या सूचनेनुसार कोर्स वर्क पूर्ण केला आहे. कोर्स वर्क नंतर प्रलंबित असलेली परीक्षा अजुनही विद्यापीठाद्वारे घेतल्या गेलेली नाही. त्यामुळे पी.एचडी चे विदयार्थी संभ्रमात पडले आहे. 

JRF च्या विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा न झाले मुळे व त्या वेळेत रजिस्ट्रेशन न होऊ शकल्यामुळे विदयार्थी फेलोशिप मिळण्यापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे याबाबत तात्काळ ठोस पाऊल उचलावे, अशी माडणी एआयएसएफ ने केली आहे.  

यावेळी एआयएसएफ चे जिल्हा सचिव योगेश चव्हाण, विजय भारती, कार्तिक पुरी, विदयार्थी अब्दुल रहेमान खान, सलीम खान, पूजा गुल्हाने, मंजुश्री बारबुद्धे, वनिता राऊत, राजेश आडे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय