Friday, May 17, 2024
Homeआंबेगावआंबेगाव : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा असाणे येथे पालक मेळावा संपन्न 

आंबेगाव : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा असाणे येथे पालक मेळावा संपन्न 

घोडेगाव : असाणे (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेचा इयत्ता 10 वी चा निकाल सलग तीन वर्ष 100 टक्के लागला आहे.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजेंद्र आंधळे म्हणाले, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सतत संवाद सुरु असला पाहिजे, जेणे करून येणाऱ्या अडचणी सोडवणे सोपं जाईल. तसेच शाळेत नव्याने सुरू केलेली जिम, लर्निंग, गेम रूम याबाबतची माहिती दिली.

आदिवासी भागातील असणारी ही शाळा गेल्या कित्येक वर्षापासून सुरळीतपणे चालू आहे, येथे असणारे कर्मचारी हे आपलेच मुल आहेत असे समजून सहकार्य ठेवत असल्यामुळे या शाळेचे नाव आजही उज्ज्वल आहे, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास भोकटे म्हणाले. 

यावेळी आदिवासी सेवक शंकर मुदगून, अधीक्षक प्रवीण शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्ता लोहकरे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन श्रीमती सीमा चपटे व विजय डप्पडवाड यांनी केले. 

यावेळी आनंद वानखडे, मंगेश ठोकळ, गजानन असवले, प्रतीक राऊत, श्रीमती शितल पिंपरे, श्रीमती उषा पवार, श्रीमती सरला भागवत या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मेळावा यशस्वी करण्यास सहकार्य केले. शिक्षिका सरिता कोकाटे यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय