Monday, January 13, 2025
HomeNewsआदिवासी वाडीसाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी वाडीसाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

दापोली : स्मशानभूमीसाठी संघर्ष करत असलेल्या जामगे ग्रामपंचायत मधील नवानगर कातकरवाडी व कातकरवाडी या दोन वाडीसाठी आदिवासी बांधवांना पाण्याची सोयच नसल्याची बाब समोर आली आहे. जामगे गावातील आदिवासी बांधवांचा स्मशानभूमीचा विषय ताजा असतानाच पाण्याचाही गंभीर प्रश्न असल्याचे समोर आले आहे.

जामगे येथील आदिवासी बांधवांना पाण्याची व्यवस्था करा, या मागणीसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी गटविकास अधिकारी दापोली यांची भेट घेत मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देण्यात आले. यावेळी जामगे गावातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जामगे ग्रामपंचायत हद्दीतील नवानगर कातकरवाडी – आदिवासीवाडी व कातकरवाडी या दोन वाड्यांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. 15 व्या वित्त योजना 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बोअरवेल खणून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु बोअरवेल बंद असल्यामुळे लोक पावसाचे पाणी व नदी नाल्यातील दूषित पाणी पित आहेत, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या दोन आदिवासी वाडीसाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली.

संबंधित लेख

लोकप्रिय