आपत्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती ; २४ तास आरोग्य सेवा (Alandi)
आळंदी / अर्जुन मेदनकर : तीर्थक्षेत्र आळंदीतील कार्तिकी यात्रा यावर्षी भाविकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेस प्राधान्य देत साजरी होणार आहे. यासाठी राज्य शासनाचे आरोग्य विभागाने प्रशासकीय तयारीसह पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि औषध पुरवठ्याचे नियोजनास प्राधान्य दिले असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले. (Alandi)
यावर्षी माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि परंपरांचे पालन करीत साजरा होत आहे. या सोहळ्यात राज्य परिसरातून आळंदीत आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आरोग्य विभागाचे माध्यमातून यात्रा काळात २४ तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, मार्गदर्शनाखाली तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात २४ तास आरोग्य सेवा बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभागाचे माध्यमातून सुरु राहील. लाखो भाविकांची गर्दी लक्षांत घेऊन अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी वृंद मागविण्यात आला आहे. यात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिक, परिचर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ , आंतरवासी विद्यार्थी यांचा समावेश आहे.
अनेक वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांचा समावेश तीन सत्रात २४ तास सेवा देण्यासाठी समावेश आहे. या शिवाय आवश्यकते नुसार जास्तीच्या रुग्णवाहिकां यावेळी तैनात ठेवण्यात येणार आहे.
शहरात बाह्य रुग्ण विभाग चाकण चौक, दर्शनबारी, वडगाव रस्ता, माऊली मंदीर, इंद्रायणी नदी घाट परिसर आदी ठिकाणी यात्रेसाठी बाह्य रुग्ण विभाग कार्यरत रहाणार आहे. यासाठी प्रत्येक बाह्य रुग्ण विभागात दोन डॉक्टर्स, दोन अधिपरिचारिका, एक शिपाई कर्मचारी यात्रा काळात कार्यरत राहतील.
आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांचे स्थानिक नियंत्रणात रुग्णालयात यात्रेत भाविकांच्या आरोग्यासाठी आरोग्य सेवा व आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत रहाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी यांचेसह स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग तसेच २४ तास रुग्णवाहिका वाहन चालक सेवा प्रभावीपणे कार्यरत राहील असे नियोजन करण्यात आले आहे.
आळंदी परिसरात पाणी शुद्धीकरण मोहीम
यात्रा कालावधीत आळंदी शहर परिसरात जिल्हा आरोग्य अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनात आळंदी परिसरात पाणी शुद्धीकरण मोहीम, कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यात सार्वजनिक हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना, खाद्य पदार्थ यांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक काम पाहणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले. (Alandi)
याशिवाय यात्रा काळात आरोग्य बूथ व्यवस्थापन, स्वच्छता नियंत्रण, रुग्णालयीन कामकाज, रुग्णवाहिका व्यवस्था व नियंत्रण यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा खेडकर, आरोग्य सेवक, दिपाली लोंढे आदीं कर्मचारी आळंदी यात्रेत आरोग्य सेवेचे नियोजन करीत आहेत. यांच्या माध्यमातून भाविकांच्या आरोग्याची काळजी यात्रा काळात घेण्यात येणार आहे.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी कामकाज केले जात असून यासाठी रुग्ण कल्याण नियामक समिती व रुग्ण कल्याण कार्यकारी समितीचे सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांचे मार्गदर्शनातून अधिक आरोग्यदायी यात्रा, आळंदीत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे समितीचे सदस्य माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांनी सांगितले. या समितीत सतीश चोरडिया, पांडुरंग गावडे कामकाज पाहत आहेत.
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर