Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यअकोले : सांदणकडून कोतूळ कोविड सेंटरला मदत

अकोले : सांदणकडून कोतूळ कोविड सेंटरला मदत

कोतूळ : सांदण आदिवासी लोकचळवळ संगमनेर यांचेकडून आज अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोविड केअर सेंटरला औषधोपचार कीटचे वितरण करण्यात आले. 

पहिल्या टप्प्यात राजूर येथील कोविड केअर सेंटरला मदत केल्यानंतर ‘एक हात मदतीचा, आपल्या बांधवांसाठी’ या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या आर्थिक योगदानातून दुसऱ्या टप्प्यातील कोतुळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोतुळ येथील कोविड केअर सेंटरला वैद्यकीय अधिकारी कैलास विजय कोळपकर व पर्यवेक्षक घिगे बी.बी. यांचे उपस्थितीत सांदण आदिवासी लोकचळवळीचे अध्यक्ष अरविंद सगभोर व सचिव किरण बांडे यांच्या हस्ते पाच दिवसाची औषधोपचार कीट देण्यात आली. यावेळी  कोविड केअर सेंटरला भोजन देणारे स्वयंसेवकही  उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी कोळपकर यांनी सांदण आदिवासी लोकचळवळीचे आभार व्यक्त केले. यावेळी कोतूळ येथील कोविड केअर सेंटरमध्ये ६० पॉझिटिव्ह रुग्ण होते.

एक हात मदतीचा या उपक्रमासाठी अनिल डगळे, अर्चना खाडे, विजय कोंडार, शोभा साबळे, वंदना भवारी, शरद गवारी, सीता पिचड, सचिन भांगरे, रेखा गवळी, भास्कर बांडे, संतोष डगळे, भरत डगळे, अंकुश मोरमारे, मीनाक्षी शेंगाळ, विठाबाई सुकटे, स्वप्निल सुपे, दीपा वेडे, अश्विनी भांगरे, अदिराज भांगरे, सोनाली ठोकळ, उमेश दराडे, उषा कोरडे, अंकुश भांगरे, बाबासाहेब डगळे व चि.वेदांत डगळे यांनी आर्थिक योगदान दिले.


संबंधित लेख

लोकप्रिय