Friday, November 22, 2024
HomeAkoleAkola : बाळापुर विधानसभा मतदारसंघातील नामनिर्देशन छाननी: तीन उमेदवारांचे नामनिर्देशन रद्द

Akola : बाळापुर विधानसभा मतदारसंघातील नामनिर्देशन छाननी: तीन उमेदवारांचे नामनिर्देशन रद्द

पातुर तालुका विकास मंचाचे अपक्ष उमेदवार ठाकूर शिवकुमार सिंह बायस यांची उमेदवारी कायम (Akola)

अकोला : बाळापुर मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे यामध्ये शिवकुमार सिंह बायस ठाकूर हे अग्रेसर आहेत. बाळापुर विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन छाननीच्या प्रक्रियेत तीन उमेदवारांचे नामनिर्देशन रद्द करण्यात आले. रद्द झालेल्या उमेदवारांमध्ये नितीन विश्वासराव देशमुख, संजय किसन फाटकर, आणि प्रमोद गणपत पोहरे यांचा समावेश आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या निवडणूक लढण्याच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. (Akola)

यावेळी अपक्ष उमेदवार ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे नामनिर्देशन कायम राहिले आहे. पातुर तालुका विकास मंचाचे सदस्य असलेले शिवकुमार यांची उमेदवारी बाळापुर विधानसभेसाठी विशेष चर्चेत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, ज्यामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा देणे यांचा समावेश आहे.(Akola)

सामाजिक कार्य आणि विकास

ठाकूर शिवकुमार यांना पुणे शहरात अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा श्रेय आहे. त्यांनी पातुरमध्ये ग्रामीण युवकांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आणि शासनाच्या आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आमरण उपोषण करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

ते ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती निर्माण करण्यासाठी उद्योजकांना आकर्षित करण्यात प्रयत्नशील आहेत. शिवकुमार यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करून योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव टाकला.

निवडणुकीची तयारी

2024 विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवकुमार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेतली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांच्या चांगल्या संबंधांमुळे त्यांना लोकशाहीच्या उत्सवात प्रमुख भूमिका निभावण्याची संधी मिळू शकते. त्यांनी सांगितले की, अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवीत आहेत, कारण त्यांना लोकांच्या विश्वासाची कदर आहे. कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतांना स्वबळावर मतदार संघात काही कोटींचे विकास कामे त्यांनी करून दाखविले आहेत.

यामुळे बाळापुर विधानसभा मतदारसंघातील राजकारणात ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे स्थान निश्चितपणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा संघर्ष कसा असेल याकडे लक्ष लागले आहे.

डॉ. शिवकुमार सिंह बायस यांचा पुणे येथे सन्मान

बाळापुर मतदारसंघातील पुणे येथे रहिवासी असलेल्या मतदारांनी डॉ. शिवकुमार सिंह बायस यांना विजयी करण्याचा केला निर्धार केला आहे. बाळापुर मतदार संघातील उद्योजक युवा मित्रांशी शिवकुमार सिंह बायस यांनी संवाद साधून बाळापुर विधानसभा मतदार संघातील युवकांच्या रोजगारा संदर्भात चर्चा केली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय