Friday, November 22, 2024
Homeराज्यरेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करुन चढ्या दरानं त्यांची विक्री करण्याचं रॅकेट सुरु -...

रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करुन चढ्या दरानं त्यांची विक्री करण्याचं रॅकेट सुरु – अजित पवार यांचा आरोप

मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांमधल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावं. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात, त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येनं रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करुन चढ्या दरानं त्यांची विक्री करण्याचं रॅकेट सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैर प्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेनं चौकशी करावी, अशीही मागणी अजित पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

हे ही वाचा :

नव्या संसदेच्या उद्घाटनावरून वाद, ‘या’ १९ पक्षांचा संसद उद्घाटनवर बहिष्कार

WhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यात नोकरी शोधताय ? विविध शासकीय, निमशासकीय विभागात मोठी भरती

व्हिडिओ : पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

जसा गाडीचा, पिकाचा विमा घेतो; तसा स्वतः चा विमा हवाच ! आजच विमा काढून घ्या !

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय