Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविद्यार्थ्यांनो ! आज बारावीचा निकाल; किती वाजता अन् कुठे पाहाल? जाणून घ्या...

विद्यार्थ्यांनो ! आज बारावीचा निकाल; किती वाजता अन् कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

पुणे / सुशिल कुवर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज( दि.25 मे ) रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून असलेली निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्याल्यांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या संकेतस्थळांवर पहा निकाल

1. mahresult.nic.in

2. https://hsc.mahresults.org.in

3. http://hscresult.mkcl.org

हे ही वाचा :

नव्या संसदेच्या उद्घाटनावरून वाद, ‘या’ १९ पक्षांचा संसद उद्घाटनवर बहिष्कार

WhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यात नोकरी शोधताय ? विविध शासकीय, निमशासकीय विभागात मोठी भरती

व्हिडिओ : पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय