Friday, May 17, 2024
Homeग्रामीणऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने 'या' मागण्यांसाठी कोल्हापूरात आंदोलन.

ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने ‘या’ मागण्यांसाठी कोल्हापूरात आंदोलन.

प्रतिनिधी :- देशभरात कोरोना मुळे विदारक परिस्थिती तयार झाली आहे केंद्र सरकार या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. आर्थिक पॅकेज स्वरूपात मदत अपेक्षित असताना कर्ज पॅकेज जाहीर केले गेले आहे. जनतेच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी संपूर्ण देशभर ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने कोल्हापूरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले.

       युवक विद्यार्थी याची शैक्षणिक कर्ज माफ करा, प्रत्येक कुटुंबाला कोरोना रिलीफ फंड म्हणून १० हजार रुपये द्यावेत, वैद्यकीय शिक्षणामध्ये देशभरात ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करावे,  सर्व खाजगी हॉस्पिटलचे राष्ट्रीय करण करावेत व आपल्या ताब्यात सरकारने घ्यावे, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा, भगतसिंग रोजगार हमी योजना कायदा लागू करा, विज बिल फोन बिल व कर्जांचे हप्ते तीन महिन्यासाठी रद्द करा. कर्ज हप्त्यांचे व्याजा आकारू नका, दलित, मुस्लिम व मानव अधिकार कार्यकर्त्यांचे अटकसत्र थांबवा, पेट्रोल डिझेल भावावर मागे घ्या, आदी मागण्या करण्यात आल्या.

            यावेळी गिरीश फोंडे,जावेद तांबोळी,आरती रेडेकर अमोल देवड़कर, राम करे, लखन करे, मंगेश कांबळे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय