Wednesday, October 30, 2024
Homeताज्या बातम्याLadka Bhau Yojana : लाडकी बहीण' योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’...

Ladka Bhau Yojana : लाडकी बहीण’ योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’ मिळणार लाभ

Maharashtra Ladka Bhau Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अशात आणखी एक योजना राज्य सरकारने आणली आहे. (Ladka Bhau Yojana)

लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी राज्य सरकाने योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यात सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा विस्तार करताना, आता विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणीप्रमाणेच आम्ही आता आमच्या प्रिय भावांना, म्हणजेच विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदत करणार आहोत.” या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6000 रुपये, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 8000 रुपये, आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. (Ladka Bhau Yojana)

राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ही आर्थिक मदत उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल आणि त्यांची आर्थिक ओझी कमी होईल.

Ladka Bhau Yojana

योजनेच्या विस्तारामुळे सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे स्वागत सर्वत्र होत असून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

कृषी महाविद्यालय, सोनापूर अंतर्गत भरती

Nagpur : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 97 जागांसाठी भरती

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

संबंधित लेख

लोकप्रिय